आपल्या धमाकेदार अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनचा खूप मोठा फॅन आहे. त्याने मायकल जॅक्सनच्या जयंतीचं निमित्त साधून एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या आवडत्या डान्सरला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मक्याचं कणीस ट्विट करत बिग बींनी सांगितलं यशाचं गमक; फोटो होतोय व्हायरल…
रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार
टायगरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मायकलच्या ‘द वे यु मेक मी फील’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे अगदी हुबेहुब त्याने मायकल सारखा डान्स केला आहे. “मायकल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. टायगरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत १९ लाखांपेक्षा अधिक वेळा डान्स पाहिला गेला आहे.
मायकल जॅक्सन एक लोकप्रिय पॉप सिंगर होता. आश्चर्याची बाब म्हणजे गाण्यासोबतच तो आपल्या अनोख्या डान्स शैलीसाठीही प्रसिद्ध होता. त्याच्या नृत्य शैलीला आज लॉकिंग पॉकिंग म्हणून ओळखले जाते. मायकल विशेषत: आपल्या मून वॉकसाठी प्रसिद्ध होता. १९९६ मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. शिवसेनेच्या ‘शिव उद्योग सेनेनं’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. सहार विमानतळावर जॅक्सन उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर ही कॉन्सर्ट झाली. ही कॉन्सर्ट चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2020 5:40 pm