01 December 2020

News Flash

टायगरने ६ फुट उंच उडून मारली ‘बटरफ्लाय किक’; व्हिडीओ पाहून तारा सुतारीया म्हणाली…

टायगर श्रॉफची ही खतरनाक किक पाहून अभिनेत्री झाल्या चकित

आपल्या धमाकेदार अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ ‘किंग ऑफ कुंगफु’ अर्थात ब्रूस लीचा खूप मोठा फॅन आहे. ब्रूसच्या स्टाईलमध्ये फायटिंग करतानाचे व्हिडीओज तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यावेळी देखील त्याने असाच एक ‘बटरफ्लाय किक’ मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही किक पाहून बॉलिवूड कलाकार देखील थक्क झाले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड

 

View this post on Instagram

 

Shit happens… but hes still standing@nadeemakhtarparkour88 great reaction bro @raakeshyadhav @kuldeepshashi @swainvikram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…

टायगरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ब्रूस ली सारखीच’बटरफ्लाय किक’ मारताना दिसत आहे. ही किक मारणं अत्यंत कठीण काम आहे. कारण थोडासा जरी तोल गेला तरी आपण डोक्यावर पडू शकतो. किंवा सराव करताना जर थोडासा अंदाज चुकला तर समोरील व्यक्तीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. परंतु मार्शलआर्टमध्ये पटाईत असलेल्या टायगरने मात्र अगदी सहजगतीने या किकचं प्रदर्शन केलं.

टायगरचा हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री तारा सुतारीया आणि दिशा पटानी देखील चकित झाल्या आहेत. त्यांनी या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत टायगरचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. यापूर्वी देखील त्याने असाच एक व्हिडीओ शेअर करुन सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 11:54 am

Web Title: tiger shroff flying kick tara sutaria disha patani viral video mppg 94
Next Stories
1 ‘ये रिश्ते हैं प्यार के’ घेणार प्रेक्षकांचा निरोप; शाहीर शेख म्हणाला…
2 मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचे आरोप; पत्नीविरोधातही तक्रार दाखल
3 स्मिता पाटील यांना पडलेलं स्वप्न आणि ‘बिग बीं’चा अपघात..
Just Now!
X