‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या टायगर श्रॉफची ओळख अॅक्शन हिरो म्हणून निर्माण झाली. अतिशय किचकट, कठीण आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी मारधाडीची दृश्ये अत्यंत कौशल्याने पार पाडण्याचे कसब या तरुण अभिनेत्याकडे आहे. मुळात अभिनयापेक्षा त्याच्या पिळदार शरीरयष्टी आणि लूकसाठी विशेष पसंती दिली जाते. टायगरला फिटनेसचं प्रचंड वेड असून तासनतास तो जिममध्ये घाम गाळत असतो. एकंदरीत त्याचा आहार आणि फिटनेस फंडा आहे तरी काय हे जाणून घेऊयात…

– आठवड्यातील सातही दिवस शरीराच्या वेगवेगळ्या भागावर लक्ष केंद्रीत करत वर्कआऊट करण्यावर भर देतो. तो उत्तम डान्सर आणि जिमनॅस्टसुद्धा आहे. त्याचसोबत त्याने तायक्वांडोचेही प्रशिक्षण घेतले. तो दररोज किक बॉक्सिंग आणि फुटबॉलचाही सराव करतो.
– टायगर मांसाहारी असून चिकन आणि अंडी या गोष्टींचा त्याच्या आहारात नेहमीच समावेश असतो. त्याच्या नाश्त्याला आठ अंडी आणि ओटमीलचाही समावेश असतो.

– दुपारच्या जेवणापूर्वी ड्रायफ्रूट्स आणि शेक घेतो. तर जेवणात ब्राऊन राइससोबत चिकन आणि उकडलेल्या भाज्या खातो.
– संध्याकाळी प्रोटीन शेक घेतल्यानंतर टायगर जिमनॅस्टिकचे प्रशिक्षण घेतो.
– त्याच्या रात्रीच्या जेवणात मासे आणि ब्रोकलीचा समावेश असतो.

– जिममध्ये टायगर सोमवारी आणि मंगळवारी चेस्ट वर्कआऊट करतो. बुधवारी पाय, तर गुरुवारी हातांचा व्यायाम करतो. शुक्रवार आणि शनिवारी खांदे आणि कॉलर बोनच्या व्यायामावर भर देतो तर रविवारी अॅब्सवर त्याचा भर असतो.
– फिट बॉडीसाठी तो टायगर दारू आणि सिगरेटच्या व्यसनापासून दूर असून इतरांनाही हाच सल्ला देतो. त्याचप्रमाणे उत्तम देहयष्टीसाठी पुरेशी झोपसुद्धा आवश्यक असल्याचं आवर्जून सांगतो.