News Flash

माझ्यासमोर उभं राहण्याची ताकद फक्त या अभिनेत्यामध्ये – हृतिक रोशन

आता सगळेच अभिनेते वैविध्यपूर्ण भूमिका करत असतात, दोन अभिनेते असणारे चित्रपट करायला मला नक्कीच आवडेल.

हृतिक रोशन

बॉलिवूडमध्ये अॅक्शन, डान्सिंग स्टार म्हटलं की, अभिनेता हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांची नावं डोळ्यांसमोर येतात. बऱ्याच वर्षांपासून हृतिकने त्याच्या अनोख्या नृत्यशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टायगरने सुद्धा काही वर्षांपूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत येऊन आपल्या नृत्यकौशल्याची छाप चाहत्यांवर पाडली आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या फॅन्समध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. आगामी ऍक्शनपटाच्या निमित्ताने हृतिक आणि टायगर एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट स्वीकारण्यामागे हृतिकची स्वतःची कारणे आहेत. दोन्ही अभिनेते या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

हृतिकने टायगरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. माझ्यासोबत काम करण्यासाठी आणि विरोधी भूमिकेसाठी केवळ टायगर श्रॉफच योग्य असल्याचं हृतिकने म्हटलं आहे. टायगरने आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या असून त्याच्याबरोबर काम करण्याचा आनंद असल्याचे सांगत हृतिकने त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली. “माझ्यासमोर उभं राहण्याची आणि मला आव्हान देण्याची ताकद फक्त टायगरमध्ये आहे.” असंही तो म्हणाला.

“काबील आणि ‘सुपर ३०’ नंतर मला एक वेगळा चित्रपट करायचा होता. आता सगळेच अभिनेते वैविध्यपूर्ण भूमिका करत असतात. टायगरसोबत काम करणं ही खूप मजेशीर गोष्ट आहे. दोन अभिनेते असणारे चित्रपट करायला मला नक्कीच आवडेल.” असंही तो म्हणाला.

सध्या हृतिक ‘सुपर ३० च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे तर टायगरसुद्धा इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. मात्र टायगरने आत्तापर्यंत अनेकदा जाहीरपणे हृतिकबरोबर आगामी चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. टायगर स्वतः हृतिकचा खूप मोठा चाहता आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 2:43 pm

Web Title: tiger shroff hrithik roshan actiion film djj 97
Next Stories
1 Video : स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
2 कंगनाच्या बहिणीने म्हटलं ‘सस्ती कॉपी’, तापसीने दिलं सडेतोड उत्तर
3 मुलीसाठी अक्षय कुमारने केला ‘हा’ चित्रपट
Just Now!
X