12 November 2019

News Flash

Video: टायगरकडून मायकल जॅक्सनला अनोख्या पद्धतीने आदरांजली

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आगळ्या वेगळ्या नृत्यशैलीच्या जोरावर संपूर्ण जगाला वेड लावणारा किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनची आज पुण्यतिथी आहे. मायकाल जॅकनने १० वर्षांपूर्वी, २५ जून २००९ रोजी जगाचा निरोप घेतला. मायकल जॅक्सनच्या पुण्यतिथी निमित्त अनेक बॉलिवूड कलकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या कालाकरांमधील टायगर श्रॉफने त्याच्या नृत्यामधून मायकल जॅकसनला आदरांजली वाहिली आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मायकल जॅक्सनच्या पुण्यतिथी निमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर रणवीर सिंगच्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘खलीबली’ गाण्यावर मायकला जॅक्सनच्या स्टेप्स करताना दिसत आहे. टायगरसह आणखी एक कोरिओग्राफर नृत्य करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान टायगरने हा व्हिडीओ शेअर साजेसं असं कॅप्शनही दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या टायगर त्याचा आगामी चित्रपट ‘बागी ३’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात टायगरसह श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच टायगर हृतिक रोशन आणि वाणी कपूर यांच्यासह आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा करणार आहे. परंतु या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

First Published on June 25, 2019 2:31 pm

Web Title: tiger shroff play movies ranveer singhs khalibali song on michael jackson death anniversary avb 95