News Flash

‘राधे’मध्ये सलमान आणि दिशाची केमिस्ट्री पाहून टायगर म्हणाला…

टायगरची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात अभिनेत्री दिशा पटाणी मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि प्रवीण तरडे हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच सलमानने चित्रपटात पहिल्यांदाच किसिंग सीन देखील दिला आहे. दरम्यान, दिशाचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफने ट्रेलर पाहून प्रतिक्रिया दिला आहे.

टायगरने चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये त्याने वडील जॅकी श्रॉफ यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने अजूनही सर्वात हँडसम हिरो असे म्हटले आहे. पुढच्या स्क्रीनशॉटमध्ये त्याने दिशाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘स्मॅशिंग ट्रेलरसाठी शुभेच्छा’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘राधे’साठी सलमानने तोडली ‘No kiss’ पॉलिसी, ट्रेलरमधील त्या सीनची चर्चा

टायगरने आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये त्याने सलमानचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘अभिनंदन’ असे म्हटले आहे.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 6:07 pm

Web Title: tiger shroff reacts on salman khan and disha patani romance in radhe avb 95
Next Stories
1 रानात राबतायत बाप-लेक….सैफ आणि तैमूरचे ‘हे’ नवे फोटो पाहिलेत का?
2 Video: ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर भारती सिंग आणि नोरा फतेहीमध्ये झाले भांडण
3 मालिकांचे चित्रीकरण सुरु…; महाराष्ट्राच्या महावाहिनीने घेतला अविरत मनोरंजनाचा वसा
Just Now!
X