News Flash

दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं? टायगर म्हणतो..

जेव्हा सेलिब्रिटी जोडी डिनर डेटला जाते तेव्हा बिल कोण भरत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

दिशा पटानी, टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ व दिशा पटानी ही बी-टाऊनमधली सर्वांत ‘कूल’ जोडी मानली जाते. कार्यक्रमांमध्ये, डिनर डेटसाठी हे दोघं अनेकदा एकत्र दिसतात. जेव्हा सेलिब्रिटी जोडी डिनर डेटला जाते तेव्हा बिल कोण भरत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? बरं, या प्रश्नाचं उत्तर टायगरने दिलं आहे. दिशासोबत डिनर डेटला गेल्यावर बिल कोण भरतं हे त्याने सांगितलं आहे.

हे डिनर डेट्स मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट करत दोघंही आळीपाळीने बिल भरत असल्याने टायगरने सांगितलं. ‘सुरुवातीला मीच बिल भरायचो. पण नंतर दोघांनी आळीपाळीने बिल भरायचं ठरवलं. आधी अनेकदा मीच बिल भरलं होतं. पण दिशाला ते आवडत नाही. तेव्हापासून एकदा मी व एकदा ती असे बिल भरतो,’ असं तो म्हणाला.

Video : स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!

दिशा-टायगरने रिलेशनशिप असल्याचं कधीच अधिकृतपणे जाहीर केलं नाही. किंबहुना या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्याही चर्चा होत्या. तर मध्यंतरी दिशा ही युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने त्या दोघांच्या मैत्रीबाबतही चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 4:07 pm

Web Title: tiger shroff reveals who pays the bill on his dinner dates with disha patani ssv 92
Next Stories
1 माझ्यासमोर उभं राहण्याची ताकद फक्त या अभिनेत्यामध्ये – हृतिक रोशन
2 Video : स्वप्निल जोशी-सिद्धार्थ चांदेकरचा भन्नाट ‘बॉटल कॅप चॅलेंज’; तुम्हीही पोट धरून हसाल!
3 कंगनाच्या बहिणीने म्हटलं ‘सस्ती कॉपी’, तापसीने दिलं सडेतोड उत्तर
Just Now!
X