27 November 2020

News Flash

Video : टायगर-श्रद्धाच्या डान्सचा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच

पाहा, टायगर-श्रद्धाच्या डान्सची हटके स्टाइल

खासकरुन आपल्या अॅक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. अनेक वेळा चाहत्यांमध्ये टायगरच्या दमदार अॅक्शन सीनसोबतच त्याच्या नृत्यकौशल्याचीही चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर टायगरचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात टायगरच्या डान्सचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या टायगरने त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना असून यात तो ‘दस बहाने’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील असल्याचं पाहायला मिळत आहे. यात हे दोघंही नृत्याचा सराव करत आहेत.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा असून चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट्स करत असल्याचं दिसून येत आहे. टायगर लवकरच ‘हिरोपंती २’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 6:49 pm

Web Title: tiger shroff shraddha kapoors dance moves old rehearsal video dcp 98
Next Stories
1 प्रसिद्ध अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक
2 सिद्धार्थ मल्होत्राला कियारा करतेय डेट? अक्षय कुमारच्या इशाऱ्यावरून सुरू झाली चर्चा
3 Video : लॉकडाउननंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणायचं असेल, तर…
Just Now!
X