News Flash

दिशाने टायगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिण म्हणाली ‘तुझ्याकडे या पेक्षा…’

तिने केलेली कमेंट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आज २ मार्चरोजी वाढदिवस आहे. तो आज ३१ वर्षांचा झाला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटाणीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या पोस्टवर टायगरची बहिण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट केली आहे.

दिशाने टायगरचे काही अतरंगी फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने टायगरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कॅसनोवाला (cassanova) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी बनी प्रमाणे चमकत रहा…’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट करत टायगरला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

तिच्या या फोटोवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने कमेंट केली आहे. तिने कमेंट करत ‘क्यूट, पण हे नक्की आहे की तुझ्याकडे यापेक्षा चांगले फोटो असणार’ असे म्हटले आहे.

टायगरने ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा ‘बागी’ हा चित्रपट हिट झालाय. आता तो ‘गणपत’, बागी ४ आणि हीरोपंती २ या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. चाहत्यांमध्ये टायगरच्या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 3:48 pm

Web Title: tiger shroff sister krishna shroff reply to disha patani on her brother pic avb 95
Next Stories
1 उर्वशीचा So Preety व्हिडीओ, अदाकारीवर चाहते फिदा
2 नोराच्या ‘या’ बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क
3 ‘सायना’चं पहिलं पोस्टर रिलीज, परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत
Just Now!
X