News Flash

दिशा पटानीसाठी ‘हा’ अभिनेता परफेक्ट; टायगरच्या बहिणीने सुचवले नाव

एका चॅट शो दरम्यान कृष्णाने हे नाव सुचवले आहे

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याची कबूली दिलेली नाही. आम्ही दोघे फक्त चांगले मित्र आहेत असे सांगताना टायगर आणि दिशा दिसतात. परंतु आता टायगरची बहिण कृष्णा श्रॉफने एका मुलाखतीमध्ये टायगर श्रॉफ सिंगल असल्याचे म्हटले आहे.

टायगर आणि दिशा यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नसली तरीही ते दोघे नेहमी एकत्र फिरताना दिसतात. तसेच दिशाचे टायगरची बहिण कृष्णासह देखील चांगले बॉन्डींग आहे. परंतु टायगर अद्याप सिंगल असल्याचे कृष्णाने सांगितले आहे. एका चॅट शोदरम्यान कृष्णाला तिच्या रिलेशनशीप बद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. ‘प्रत्येकजण आपल्या पद्धतीने ही गोष्ट हॅन्डल करत असतो. मला माझ्या रिलेशनची अधिकृत घोषणा करण्यात काहीच हरकत नाही. पण मला कळत नाही रिलेशनशीपसारख्या गोष्टींना जास्त महत्व का दिले जाते? मी ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असेल त्या व्यक्तीचा मला अभिमान असेल. त्यामुळे मला माझे रिलेशन लपवण्याची वेळच येणार नाही’ असे कृष्णा म्हणाली.

त्यानंतर कृष्णाने टायगरच्या रिलेशनवर वक्तव्य केले. ‘मी कधीच खोटे बोलत नाही आणि मला माहित आहे टायगर १०० टक्के सिंगल आहे. मी एक प्रोटेक्टीव बहिण आहे आणि टायगर एक साधा मुलगा. त्याच्या या स्वभावाचा अनेक जण फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्याच्या बाबतीत नेहमीच अर्लट असते’ असे कृष्णा पुढे म्हणाली.

या चॅट शोमध्ये कृष्णाला दिशाबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले होते. ‘दिशाला मी आदित्य रॉय कपूरसह सेट करुन देण्याचा प्रयत्न करत आहे’ असे उत्तर तिने दिले. त्यानंतर तिला एखादी मुलगी टायगरला चीट करत असेल तर तु काय करशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कृष्णाने ‘मी त्या मुलीची आवस्था फार वाईट करेल’ असे उत्तर दिले. दिशा आणि आदित्य मोहित सूरी यांचा आगमी चित्रपट ‘मलंग’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 3:34 pm

Web Title: tiger shroff sister says that tiger is single avb 95
Next Stories
1 माझ्या जीवनावर एक चांगला चित्रपट होऊ शकतो- रानू मंडल
2 अमेरिकी महिलेकडून प्रियांका चोप्राचा अपमान, पाहा व्हिडीओ
3 विभक्त झाल्यानंतरही दिया मिर्झा आणि पती साहिल संघा दिसले एकत्र
Just Now!
X