02 March 2021

News Flash

…म्हणून ‘हा’ फोटो शेअर करत टायगर श्रॉफने मागितली माफी

टायगरने का मागितली माफी?

अॅक्शन सीनसाठी खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. सोशल मीडियावर सक्रीय असलेला टायगर अनेकदा त्याच्या वर्कआऊटचे किंवा डान्सचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा त्याने दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा रंगली आहे.

टायगर सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असून तेथील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात एका फोटोमध्ये तो पिवळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये (हाफ पॅण्ट) दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत त्याने नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.


“मी पिवळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केल्यामुळे मला माफ करा. एकतर मी खरंच मोठा झालोय किंवा या लॉकडाउनमध्ये ही पॅण्ट लहान झाली आहे”, असं मजेशीर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, टायगर लवकरच गणपथ या आगामी चित्रपटात झळकणा आहे. या चित्रपटाचं अलिकडेच चित्रीकरण सुरु झालं आहे. ‘गणपथ’सोबत टायगर ‘हिरोपंती 2’ मध्येदेखील झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 3:13 pm

Web Title: tiger shroff sports yellow hot pants as he hits the waters in maldives dcp 98
Next Stories
1 ‘मुलगा हवा की मुलगी?’; करीनाने दिलं ‘हे’ उत्तर
2 अध्यात्मिक गुरुंनी माझ्यासोबत…,’आश्रम 2’मधील अभिनेत्रीचा खुलासा
3 छायाचित्रकारांना पाहताच घाबरली रश्मी; म्हणाली…
Just Now!
X