‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या टायगर श्रॉफची आज चाहत्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. अभिनय, नृत्य यासोबत चित्तथरारक स्टंटमुळे तो कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाला. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्याने साहसदृश्य करुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच त्याचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्याने अभिनेता हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर साहसदृश्यांचा समावेश केला आहे. त्यातच आता टायगरने पुन्हा एका चित्तथरारक स्टंट केला असून याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टायगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो समुद्रात स्टंट करताना दिसून येतं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली आहे. विशेष म्हणजे त्याचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘हॅशटॅगमूड’ असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत हा व्हिडीओ २० लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. टायगर त्याच्या स्टंट आणि डान्ससाठी विशेष ओळखला जातो. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटातील अभिनयामुळे आणि साहसदृश्यामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. टायगर लवकरच ‘बागी 3’ मध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 1:06 pm