21 January 2019

News Flash

त्या गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ होते- कतरिना

गेल्या दोन वर्षांत मी बऱ्याच गोष्टी शिकले

कतरिना कैफ

सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री प्रकाशझोतात असल्या तरीही कतरिना कैफही या अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देतेय. चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या कारकिर्दीत कतरिनाने बऱ्याच चढउतारांचा सामना केला. त्यातच तिच्या खासगी आयुष्यातही बऱ्याच गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. या सर्व गोष्टींवर मात करत कतरिनाने मात्र तिच्या करिअरवरच लक्ष केंद्रित केल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच ती ‘टायगर जिंदा है’, या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी आणि कतरिनाच्या अभिनय कौशल्याला प्रेक्षकांची मिळालेली दाद पाहता सध्या तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

२०१६ आणि २०१७ या दोन्ही वर्षांनी कतरिनाची परीक्षाच घेतली असे म्हणायला हरकत नाही. याविषयीच एका मुलाखतीत सांगताना कतरिना म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. पण, आजच्या घडीला मात्र परिस्थिती बदलली आहे. माझ्या अंतर्मनात एक वेगळीच शांतता आहे. या चित्रपटसृष्टीत इतरांप्रमाणेच मीसुद्धा फार मेहनत घेत असून त्याला मी अपवाद नाही. पण, आता या वळणावर माझ्या आयुष्यात स्थैर्य आले असून मी फार आनंदात आहे. कोणत्याही गोष्टीवर मी क्षणार्धात व्यक्त होत नाही आणि त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर फारसा परिणामही होऊ देत नाही. गेल्या दोन वर्षांत मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे. माझ्या खासगी आयुष्यापासून कामापर्यंत मी या दोन वर्षांमध्ये खूप काही शिकले आहे’, असे ती म्हणाली.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटील आलेली कतरिना येत्या काळात तिच्या इतर चित्रपटांच्या कामात व्यग्र राहिल. अली अब्बास जफरच्या या सुपरहिट चित्रपटानंतर ती शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झिरो’ आणि आमिर खान, अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

First Published on January 8, 2018 2:06 pm

Web Title: tiger zinda hai fame bollywood actress katrina kaif says i faced a lot of insecurities because of several things that happened