सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. सलमानच्या चाहत्यांना हा ट्रेलर फार आवडला. येत्या डिसेंबर महिन्यात नाताळच्या दिवसांत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात सलमान आणि कतरिना एका दहशतवादी संघटनेशी लढताना दिसत आहेत. या संघटनेने २२ भारतीय परिचारिकांचे अपहरण केले असते. सलमानला या २२ परिचारिकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचवायचे असते. या ट्रेलरमध्ये तुम्ही दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचा चेहरा पाहिला असेल.

https://www.instagram.com/p/5Gup5VrCU0/

सिनेमात अबू उस्मानची खलनायकी व्यक्तिरेखा वठविणारा हा नक्की आहे तरी कोण याची अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली असेल. तुम्हालाही अबू उस्मान नक्की कोण आहे हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला त्याची बित्तम बातमी देणार आहोत. सलमानच्या या सिनेमात खलनायक झालेल्या अभिनेत्याचे खरे नाव आहे सज्जाद डेडलाफ्रूझ. सज्जाद हा ईराणी कलाकार आहे. त्याने ईराणमध्ये अनेक टीव्ही शो आणि सिनेमांमध्ये काम केले आहे.

सज्जादने २०१५ मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या ‘बेबी’ सिनेमातही छोटीशी भूमिका साकारली होती. तुम्हाला आठवत असेल की अक्षयची टीम कुख्यात गुंडाला भारतात नेण्याच्या प्रयत्नात असते. यावेळी ते एका डॉक्टरची मदत घेतात. या डॉक्टरची भूमिका सज्जादने साकारली होती.

‘टायगर जिंदा है’ सिनेमात सज्जादने एका भावनाशून्य आणि धूर्त दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. पण सज्जादचा मुळ स्वभाव पूर्ण वेगळा आहे. सध्या ट्रेलर पाहून तरी ‘एक था टायगर’ सिनेमाची कथा जिथे संपली होती तिथूनच ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होणार असे दिसते.

https://www.instagram.com/p/1noD6lrCX_/