News Flash

अल्ता लावून कतरिना पार्टीला जाते तेव्हा..

वेस्टर्न ड्रेसवर पारंपरिक अल्ता पाहून साऱ्यांचेच लक्ष तिच्याकडे गेले

‘टायगर जिंदा है’ आणि ‘सुलतान’ या दोन ब्लॉकबस्टर सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या अली अब्बास जफरने जवळच्या मित्र- मैत्रिणींना वाढदिवसाची जंगी पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले होते. वरुण धवन, क्रिती सेनॉन, अतुल अग्निहोत्री, इसाबेल कैफ आणि कतरिना कैफ यांनी या पार्टीला आवर्जुन उपस्थिती लावली होती. संपूर्ण पार्टीत प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं ते कतरिना कैफने. ‘टायगर जिंदा है’ अभिनेत्री कतरिनाने या पार्टीत गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तिने हातावर आणि पायावर अल्ता लावला होता. वेस्टर्न ड्रेसवर पारंपरिक अल्ता पाहून साऱ्यांचेच लक्ष तिच्याकडे गेले होते.

सध्या कतरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कतरिनाच्या या फोटोंवर लोकांनी कमेंट द्यायलाही सुरूवात केली आहे. काही नेटकरांनी तर अल्ता लावलास तर भारतीय कपडेही घालायला हवे होतेस असा सल्ला दिला. तर काहींनी ट्रोल पोलिसांना बोलवा असे म्हटले. या पार्टीत कतरिनासोबत तिची बहिण इसाबेलही उपस्थित होती. इसाबेलने या पार्टीत काळ्या रंगाची जेगिंग आणि काळ्या रंगाचाच क्रॉप टॉप घातला होता. तर वरुण धवनने क्रीम रंगाचं जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती.

कतरिनाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाशिवाय ती शाहरुख खान आणि अनुष्का शर्मासोबत ‘झिरो’ सिनेमातही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 5:36 pm

Web Title: tiger zinda hai star katrina kaif attends ali abbas zafars birthday party dressed up with kumkum in hands
Next Stories
1 आयआयएममध्ये ‘बाहुबली- २’ ची केस स्टडी
2 उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न
3 सरस्वती आणि देवाशिषचं लग्न होणार?
Just Now!
X