News Flash

‘टिक-टॉक’ स्टारला करोनाची लागण; मास्कची उडवली होती खिल्ली

आता करोनाची लागण झाल्यानंतर चाहत्यांना प्रार्थनेची करतोय विनंती

समीर खान

मध्यप्रदेशचा ‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. समीरने त्याच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये मास्कची खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता करोनाची लागण झाल्यानंतर समीरने त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.

समीर मध्यप्रदेशच्या एका छोट्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी करोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मास्कची उडवली होती खिल्ली

टिकटॉक व्हिडीओमध्ये समीरने म्हटलं होतं, “अरे, तुम्ही एका छोट्याशा व्हायरसमुळे मास्क का घालत आहात? या छोट्याशा कापडाच्या तुकड्यावर का विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायचा असेल तर देवावर ठेवा.”

समीरला शुक्रवारी भोपाळच्या एम्स रुग्णालयात चाचणी केली असताना त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात मास्क घालून समीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.

समीरला करोनाची लागण झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी राहायचा, तो परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तो परिसरसुद्धा सॅनिटाइज करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 5:44 pm

Web Title: tiktok star samir khan tests positive for covid 19 after mocking face mask in his video ssv 92
Next Stories
1 ‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी अडचणीत; होतोय चोरीचा आरोप
2 ‘तारक मेहता…’मधील या कलाकाराच्या इमारतीत तीन करोनाग्रस्त; सोसायटी सील
3 लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं होणार मनोरंजन; पाहा उर्वशीचं नवं आयटम साँग
Just Now!
X