News Flash

टिकटॉक स्टार सिया कक्कडला मिळत होत्या धमक्या; कुटुंबीयांचा खुलासा

वाचा, नेमकं काय आहे प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नैराश्य आल्यामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चर्चिलं जात आहे. त्यातच १६ वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कडने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. सियाला काही दिवसांपासून धमकी मिळत होत्या, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

आत्महत्या करुन जीवन संपविणारी सिया टिकटॉकवर विशेष लोकप्रिय होती. त्यामुळे तिच्या मृत्युनंतर अनेकांना धक्का बसला आहे. सियाने राहत्या घरी आत्महत्या केली असून तिच्या जवळ कोणतीही सुसाईट नोट मिळालेली नाही. मात्र तिला काही दिवसांपासून धमकी मिळत असल्याचा उल्लेख ‘डेली मेल’ने आपल्या वृत्तात केला आहे.

टिकटॉकवर लोकप्रिय असलेली सिया अनेक वेळा तिच्या डान्सचे किंवा अभिनयाचे व्हिडीओ शेअर करत होती. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केल्यामुळे तिला धमकी मिळत होती आणि याच कारणामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होती, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी सियाने तिच्या मॅनेजरला फोन केला होता. मात्र त्यावेळी ती नेहमीप्रमाणेच तिच्याशी बोलली. मात्र त्यानंतर अचानक तिच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सियाचे टिकटॉकवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तर इन्स्टाग्रामवरही१.३५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 9:21 am

Web Title: tiktok star siya kakkar suicide family reveals getting threats making tiktok videos ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या Social Media Account वर पोलिसांना शंका; मागवली मागील सहा महिन्यांची माहिती
2 कलाकार-तंत्रज्ञांना विमा संरक्षण
3 सुशांतसोबत हा अन्याय करु नका; अभिनेत्याची निर्मात्यांना विनंती
Just Now!
X