बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने जेवढा धक्का कपूर कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना बसला तेवढाच धक्का हिंदी सिनेसृष्टीलाही बसला. कपूर कुटुंबियांच्या या दुःखात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांचे दुःख कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीना अंबानी यांनी बोनी कपूर यांना एक असे खास गिफ्ट दिले की ते गिफ्ट पाहून बोनी यांचे अश्रू अनावर झाले. टीना अंबानी या श्रीदेवीच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक. दोघीही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना फार जवळून ओळखतात. दोघींना अनेकदा पार्टीमध्येही एकत्र पाहिले जाते.
श्रीदेवी यांच्या निधनाने टीना यांनी बोनी कपूर यांना एक खास गिफ्ट दिले. टीना यांनी चांदीच्या फ्रेममध्ये सजवलेला श्रीदेवी यांचा एक फोटो गिफ्ट म्हणून दिला. हा फोटो टीना यांच्या वाढदिवसाला काढला होता. बोनी यांना तो फोटो पाहताचक्षणी रडू कोसळलं. बोनी यांनी या फोटोबद्दल टीना यांचे आभार मानले.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करण जोहर यांना अनेकदा कपूर कुटुंबासोबत पाहण्यात आले आहे. मनीष आणि करण दोघंही श्रीदेवीच्या फार जवळचे मित्र होते. जान्हवीने तिचा पदार्पणाच्या धडक सिनेमाच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरूवात केली. हा सिनेमा याच वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 8:56 pm