News Flash

“आपल्या रिलेशनशिपमुळे मी प्रसिद्ध झाले”; अभिनेत्रीने मानले ‘बिग बॉस’चे आभार

"बिग बॉस माझ्यावर प्रचंड प्रेम करतात"; अभिनेत्रीचा चकित करणारा दावा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री टिना दत्ता हिची. पिकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसमध्ये भाग घेण्यासंदर्भात टिनाला विचारण्यात आलं होतं. परंतु अपेक्षित पैसे मिळत नसल्यामुळे तिने या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे.

“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय मराठी चित्रपटांमध्ये काम

टिना दत्ता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेकदा ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत देखील असते. या पार्श्वभूमीवर चाहते तिला बिग बॉसमध्ये पाहण्यास उत्सुक होते. परंतु अपेक्षित पैसे मिळत नसल्यामुळे तिने नकार दिला. लक्षवेधी बाब म्हणजे ती केवळ नकार देऊन शांत राहिली नाही. त्यानंतर तिने बिग बॉसच्या नावाने एक पोस्ट देखील केली आहे. “डियर बिग बॉस, जितकं प्रेम मी स्वत:वर करते त्यापेक्षा अधिक प्रेम तुमचं माझ्यावर आहे. जेव्हा पासून आपल्या काल्पनिक रिलेशनशिपच्या बातम्या पसरल्या तेव्हा पासून माझी झोप उडाली आहे. लोक मला सतत फोन करतायेत. नुकताच साखरपुडा झालेल्या तरुणीसारखा अनुभव मला येतोय. माझा फोन बंद आहे. अनेक जण माझ्या वार्डरोबसाठी स्पॉन्सरशिप देखील द्यायला तयार आहेत. आपलं रिलेशनशिप सध्या प्रचंड चर्चेत आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट टिनाने केली.

‘ड्रग्जचा विरोध करणाऱ्याला बॉलिवूडमध्ये बहिष्कृत केलं जातं’; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

 

View this post on Instagram

 

My Love Letter To My Favourite Bigg Boss!  Ssssh….Romance Kharab Mat Karna

A post shared by Tinzi In TinzelTown (@dattaatinaa) on

‘बिग बॉस’चं १४ वं पर्व लांबणीवर

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ‘बिग बॉस’च्या सेटवर पाणी साचलं. त्यामुळे सेट खराब झाला. शिवाय पाऊस सुरु असल्यामुळे सेट काढताही येत नाही. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नवा सेट तयार केला जाईल. त्यानंतर ‘बिग बॉस’चं शूट सुरु होईल. या प्रक्रियेला किमान आणखी एक महिना लागेल असं क्रिएटिव्ह टीमने सांगितलं आहे. परिणामी ‘बिग बॉस’ चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:32 pm

Web Title: tina dutta bigg boss hindi season 14 mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुरानाला करोना; शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाली होती सहभागी
2 “इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात?” जावेद अख्तर यांचा सवाल
3 “सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशद्रोह नव्हे”; जावेद अख्तर यांची केंद्रावर टीका
Just Now!
X