News Flash

नुसरत जहाँचा बेबी बंपमधील पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत या पती निखिल जैनपासून वेगळ्या राहत आहेत.

(photo-instagram@nusratchirps)

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या सध्या चागल्याच चर्चेत आल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून नुसरत या पती निखिल जैनपासून वेगळ्या राहत आहेत.  दरम्यान नुसरत यांनी “निखिल जैनशी झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध होता” असा खुलासा केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्या गर्भवती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता नुसरत जहाँ यांचा बेबे बंपमधील पहिला फोटो समोर आला असून हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय.

नुसरत जहाँ यांचा बेबी बंपमधील क्यूट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत नुसरत जहाँ एका पांढऱ्या रंगाच्या क्यूट गाउनमध्ये पोज देताना दिसत आहेत. यात नुसरत खूपच सुंदर दिसत आहेत. या फोटोत नुरसत जहाँ यांच्यासोबत दोन बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तनुश्री आणि श्रावंती दिसत आहेत. नुसरत जहाँ यांची भेट घेण्यासाठी या दोघी गेल्या होत्या अशा चर्चा आहेत. हिंदूस्तान टाइम्स बंगालच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुसरतचा बेबी बंपमधील फोटो शेअर करण्यात आलाय.

हे देखील वाचा: “मला तिथे कोणी तरी असल्याचा भास झाला”; रणवीरने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरचा भयानक किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Hindustan Times Bangla (@htbangla)

पहा फोटो: पाऊस..साडी आणि तिची भेदक नजर; श्रुती मराठेच्या मनमोहक अदा

नुसरता जहाँ यांचे बेबी बंप मधील हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे नुसरत या गरोदर असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय. मात्र यानंतर आता हे बाळ नेमकं कुणाचं अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

नुसरत जहाँ अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा

दरम्यान, नुसरत जहाँ या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुसरत यांनी त्यांचा निखिल जैनसोबत झालेला विवाह हा तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध आहे असे म्हटले होते. “आमचं लग्न तुर्की कायद्यानुसार झालं होतं. ते भारतीय विशेष विवाह कायद्यानुसार वैध होणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. इथल्या कायद्यानुसार ते लग्न नव्हतं, तर फक्त एक नातं किंवा लिव्ह-इन रिलेशनशिप होतं. त्यामुळे औपचारिक घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. असं नुसरत जहाँ म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 8:18 pm

Web Title: tmc mp actress nusrat jahan baby bump photo goes viral on social media confirms her pregnancy kpw 89
Next Stories
1 Video: ‘बिग बीं’च्या डुप्लिकेटचा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण
2 ‘भाभी जी घर पर है’ फेम मनमोहन तिवारीची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
3 शरद पवारांनंतर प्रशांत किशोर मन्नतमध्ये जाऊन घेणार शाहरुखची भेट; भेटीस कारण की…
Just Now!
X