28 September 2020

News Flash

तारक मेहता…मधल्या भिडे सरांचा डॅशिंग लूक पाहिलात का??

मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात

तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली काही वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेचे देशभरात अनेक चाहते आहेत. जेठालाल, दयाबेन, टप्पू, भिडे, सोधी, बबिता, अय्यर ही सर्व पात्र अनेक भारतीयांना जवळची झाली आहेत. गेल्या काही महिन्यांत करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात मालिकांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. याचा फटका तारक मेहता मालिकेलाही बसला. परंतू सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा या मालिकेचे नवीन भाग चित्रीत व्हायला सुरुवात झाली आहे.

मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे हे पात्र साकारणारा मराठमोळा अभिनेता मंदार चांदवडकरने आपला जिमींग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेला टप्पू आणि भिडे सर यांच्यात नेहमी द्वंद्व रंगलेलं असतं. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी म्हणून नेहमी रुबाब मिरवणारे भिडे सर हे टप्पू आणि आपली मुलगी सोनू यांनी एकत्र राहू नये यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:24 am

Web Title: tmkoc actor mandar chandwadkar aka bhide sir share his dashing look on social media psd 91
Next Stories
1 करण जोहरच्या घराबाहेर दिसले बॉलिवूड सेलिब्रिटी; भेटीच्या कारणावरून चर्चा
2 ‘आशा करते तुम्ही दोघं..’; सुशांतसाठी अंकिताची भावनिक पोस्ट
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन
Just Now!
X