तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बापुजी, टप्पू, भिडे, सोढी, हाथी, अय्यर, बबिताजी, पोपटलाल ही सर्व पात्र आता प्रेक्षकांच्या मनात घरं करुन आहेत. मालिकेचा नायक जेठालाल आणि त्याचं बबिताजींवर असलेलं प्रेम हे आपण सर्वांनीच अनुभवलं आहे. बबिताजी दिसल्यावर त्यांच्यापाठीमागून धावत-पळत जाणारा जेठालाल नेहमी धमाल उडवून देतो. बबिताजी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता ही आपल्या रिअल लाईफमध्ये प्राणीप्रेमी आहे.

नुकताच सोशल मीडियावर मुनमुन दत्ताचा तारक मेहताच्या सेटवर कुत्र्याच्या पिल्लांसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मुनमुन एखाद्या लहान मुलीसारखी कुत्र्याच्या पिल्लांचे लाड करताना दिसत आहे.

मुनमुनचं श्वानप्रेम हे तिच्या चाहत्यांसाठी परिचीत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही मुनमुन अनेकदा कुत्र्यांसोबतचे फोटो टाकत असते. याचसोबत अनेकदा तारक मेहता च्या सेटवर असलेल्या भटक्या कुत्र्यांसाठी मुनमुन खाण्याची सोय करते.