‘पद्मावती’ चित्रपटाचे प्रदर्शन जसजसे जवळ येतेय तसे त्याच्यामागची संकटे वाढताना दिसत आहेत. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘पद्मावती’ला अनेक संघटनांकडून सुरुवातीपासूनच विरोध होत होता. आता भाजपकडूनही या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे.

PHOTOS : आलियाने अमृतासाठी लिहिलं खास पत्र!

भाजपने निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला एक पत्र लिहिले. या पत्रात ‘पद्मावती’ क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावू शकतो त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधींना दाखवण्याची मागणी त्यांनी केली. असे केल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे येणार नाही आणि तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादामध्ये आता भाजप नेत्या उमा भारती यांनीदेखील उडी घेतली आहे. उमा भारतींनी या चित्रपटाचा वाद संपवण्यासाठी एक मार्ग सुचवला आहे.

VIDEO : उर्मिलाच्या ‘बेबी शॉवर’मधील सुकन्या मोनेंचा डान्स पाहिलात का?

उमा भारती यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘ ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूतांशी न जोडता त्याला भारतीय स्त्रीच्या अस्मितेशी जोडले जावे. तसेच या चित्रपटाशी निगडीत वाद मिटवण्यासाठी इतिहासकार, चित्रपट निर्माते, सेन्सॉर बोर्ड आणि ज्या लोकांनी आक्षेप घेतला आहे त्यांची एक समिती तयार करून त्यांनी तोडगा काढावा.

‘पद्मावती’ चित्रपट येत्या १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.