बॉलिवूड खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमार हा वर्षभरातून केवळ ४ किंवा ५ एवढेच चित्रपट करतो. मात्र हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसून येतात. अक्षय अनेक वेळा ज्या चित्रपटातून समाजप्रबोधन होईल अशाच चित्रपटांची निवड करताना दिसतो. त्यातीलच एक निवड चित्रपट म्हणजे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने समाजप्रबोधन करत शौचालयाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्याने बॉक्स ऑफिसवर १३५ कोटींची कमाईदेखील केली. मात्र आता हा चित्रपट लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अक्षयकुमार आणि भूमि पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला टॉयलेट : एक प्रेम कथा हा चित्रपट चीनमध्ये ८ जून रोजी प्रदर्शित होणार असून याच्या नावात मात्र बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट ‘टॉयलेट हीरो’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये भारतीय चित्रपटांची कमाई सर्वाधिक होत असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले आहे. त्यात आमिर खान आणि सलमान खान यांचे चित्रपट विशेष चालतात. ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘बाहुबली-२’, ‘बजरंगी भाईजान’, ‘हिंदी मीडियम’ हे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले असून आता अक्षयचा टॉयलेट : एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  टॉयलेट : एक प्रेम कथेची चर्चा होत असतानाच  मेगन आणि प्रिन्स हॅरी हे दोघंही त्यांच्या लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे कारण म्हणजे त्यांच्या लग्नात त्यांनी आलेल्या कोट्यावधी किंमतीच्या भेटवस्तू. चला तर मग जाणून घेऊया या भेटवस्तूंबाबत त्यांचा निर्णय आणि कलाविश्वातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी….