19 September 2020

News Flash

रोहित-जुईलीमुळे मिळाला तेजस्विनीच्या आठवणींना उजाळा

काही दिवसापूर्वीच रोहितच 'प्रीत तुझी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं.

तेजस्विनी पंडित

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’ने आज महाराष्ट्राला अनेक नवीन गायक दिले. या नव्या दमाच्या गायकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली असून रोहित राऊत हे नाव सध्या तरुणाईचा युथ आयकॉन म्हणून समोर येत आहे. लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ देणाऱ्या रोहितला ‘रॉकस्टार’ ही नवीन ओळख मिळाली. काही दिवसापूर्वीच रोहितच ‘प्रीत तुझी’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर रोहितने पुन्हा एक मॅशअप करत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या जोडीने नुकतंच एक मॅशअप केलं आहे. विशेष म्हणजे या मॅशअपमध्ये ‘तोळा तोळा ते दिल दिया गल्ला’ या गाण्यांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वी रोहित आणि जुईली यांनी यापूर्वी त्यांच्या सुमधूर गीतांनी कानसेनांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. मात्र या जोडीने एकत्र कधीच पार्श्वगायन केलं नव्हतं. या मॅशअपच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हे मॅशअप तेजस्विनी पंडितला प्रचंड आवडलं असून तीने या दोघांची पाठही थोपटली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रोहित-जुईलीच्या चाहत्यांची ह्या दोघांनीही एकत्र एक डुएट गावे अशी मागणी होती. चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत या जोडीने ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’ हे मॅशअप केलं. या मॅशअपमधील गाणी ऐकताच तेजस्विनीने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत ‘तोळा तोळा’ हे गाणं तिच्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगितलं.

‘तोळा-तोळा’ हे गाणे संजय जाधव ह्यांच्या ‘तूहिरे’ चित्रपटातील असून हे गाणं स्वत: तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकरने गायलं आहे. त्यामुळे हे गाणं तिच्यासाठी स्पेशल आहे. त्यातच रोहित-जुईलीचं गाणं व्हारल होताच तेजस्विनीने एक व्हिडिओद्वारे या दोघांना शुभेच्छा दिल्या.

‘तूहिरे’ आणि ‘तोळा तोळा’ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. माझ्यासाठी आणि सईसाठी ‘गाणं गायचं’ हा एक टास्कच होता. आता त्या आठवणींना रोहित-जुईलीच्या ह्या मॅशअपमुळे उजाळा मिळाला आहे. ‘एन्ड एज युजवल यु रॉक्ड दिस साँग एज वेल’, असं म्हणत तेजस्विनीने या जोडीची पाठ थोपटली.

‘जुईली आणि मी नुकतेच सोशल मीडियावरून एक लाइव सेशन केले होते. ह्या लाइव सेशनमध्ये ब-याच चाहत्यांनी तुम्ही एकत्र येऊन कार्यक्रम करावा, असा आग्रह धरला. त्यामुळेच मग एका इम्प्रॉम्पटिव्ह सेशनमधून हे गाणे आकाराला आले’, असं रोहितने या मॅशअपविषयी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 8:52 am

Web Title: tola tola dil diya gallan mashup tejaswini pandit
Next Stories
1 शब्दांच्या पलिकडले : कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये…
2 ‘लोकांकिके’तील रावबाची चमकदार कामगिरी
3 वीकेंड गाजवण्यासाठी ‘इंडिया के मस्त कलंदर’ सज्ज
Just Now!
X