21 January 2018

News Flash

…अशी सजणार नागार्जुनची सून

यात तीन वेगवेगळ्या पेहरावांचा समावेश आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 12:21 PM

समंथा रुथ प्रभू

टॉलिवूडमधील ‘सुपरक्युट कपल’ म्हणून ओळखले जाणारे नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. लग्नमंडप, विधी, पाहुणे या साऱ्यावर जातीने लक्ष दिलं जातंय. लग्नघर म्हटलं की आणखी एका गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात ते म्हणजे नवदाम्पत्यांच्या पेहरावाविषयी. नवरी मुलगी आणि नवरा मुलगा त्यांच्या सहजीवनाची सुरुवात करण्याच्या दिवशी कोणत्या रुपात सर्वांसमोर येणार, हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्येच कुतूहल असतं.

असंच कुतूहल समंथा आणि नागा चैतन्यच्या लग्नाविषयीसुद्धा पाहायला मिळत आहे. समंथा तिच्या लग्नाच्या दिवशी कोणते कपडे घालणार, तिचे कपडे डिझाईन करण्यासाठी कोणत्या डिझायनरची निवड करण्यात आली आहे हे जाणण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून टॉलिवूडची ही लाडकी अभिनेत्री तिच्या लग्नाशी संबंधित काही पोस्ट करत आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार समंथा लग्नाच्या खास दिवशी क्रेशा बजाजने डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये दिसेल. ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या पेहरावांचा समावेश आहे.

Smile , sparkle , shine #moodoftheweek🙃

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

समंथा ख्रिश्चन समुदायाच्या लग्नसोहळ्यावेळी वधूकडून घालण्यात येणारा ‘फेरीटेल गाऊन’ घालणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर हिंदू रितीरिवाजांच्या पद्धतीने लग्न होताना ती खास दाक्षिणात्य पद्धतीच्या साडीत दिसेल. समंथा नेसणार असलेली साडी खूपच खास असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, ती साडी प्रसिद्ध निर्माते डी. रामानायडू यांची पत्नी डी. राजेश्वरी म्हणजेच नागा चैतन्यच्या आजीची आहे. ही पारंपरिक साडी नेमकी आहे तरी कशी हे लवकरच सर्वांना पाहायला मिळेल. या साडीत क्रेशा खास डिझायनर टच देऊन समंथाचं सौंदर्य आणखीन खुलवेल. साडीसोबतच तिच्या दागिन्यांमध्येही विविधता असल्याचं म्हटलं जातंय. बाजूबंद, कंबर पट्टा, खडे आणि कुंदन असलेले हार अशा पारंपरिक दाक्षिणात्य दागिन्यांसोबतच काही मॉडर्न दागिनेही समंथा घालणार आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य अनेकांचच लक्ष वेधेल यात शंकाच नाही. समंथाच्या लूकविषयी होत असलेल्या चर्चा आणि ही एकंदर माहिती पाहून आता तिला नववधूच्या रुपात पाहण्याचीच अनेकांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.

Was a Sunday well spent ❤️ #chaylove

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

First Published on October 5, 2017 12:20 pm

Web Title: tollywood favourite couple samantha ruth prabhu naga chaitanya wedding outfit
  1. No Comments.