News Flash

करोनामुळे मनोरंजन विश्वात आणखी एक मृत्यू; दक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.

करोनामुळे मनोरंजन विश्वात आणखी एक मृत्यू; दक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा
पोकुरी रामा राव

करोना व्हायरसमुळे मनोरंजन विश्वात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध तेलुगू निर्माते पोकुरी रामा राव यांनी शुक्रवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. ३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.

रामा राव यांच्यावर दहा महिन्यांपूर्वी हृदयरोगाशी संबंधित एक शस्त्रक्रिया झाली होती. हैदराबादमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोकुरी रामा राव हे निर्माते पोकुरी बाबु राव यांचे भाऊ होते. त्यांच्या इथरन फिल्म्सअंतर्गत ‘रणम’, ‘ओंतरी’, ‘यज्ञम’ या चित्रपटांची निर्मिती झाली.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 4:59 pm

Web Title: tollywood producer pokuri rama rao dies due to coronavirus ssv 92
Next Stories
1 यशराजच्या कास्टिंग डायरेक्टरवर पायल रोहतगीचे आरोप; एका भेटीसाठी घेतले इतके रुपये
2 ‘आज ते माझ्यासोबत नाहीत,पण..’; गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना संजय दत्त भावूक
3 सुशांतची अखेरची आठवण; ‘दिल बेचारा’चं नवीन पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X