01 October 2020

News Flash

टॉम क्रुजचे पुनरागमन

टॉम क्रुज हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या कलाकारांपैकी एक आहे

टॉम क्रुज

टॉम क्रुज हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या कलाकारांपैकी एक आहे. त्याने आजवर ‘मिशन: इम्पॉसिबल’, ‘रेन मॅन’, ‘रिस्की बिजनेस’, ‘मंगोलिया’, ‘नाइट अ‍ॅण्ड डे’, ‘द लास्ट समुराई’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांतून एक उत्तम अभिनेता म्हणून जगभरात नावलौकिक मिळवला आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षांत टॉमच्या वर्चस्वाला काहीशी उतरती कळा लागली आहे. आज वयाच्या ५५ व्या वर्षी अभिनयात तो तीच जुनी धार दाखवू शकेल का?, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे.यावर एकमेव उपाय म्हणून पुन्हा चित्रपटातून दमदार पुनरागमन करण्यावर टॉमचा भर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द ममी’मधून त्याने पुनरागमन केले असले तरी त्याला यापेक्षा यशस्वी चित्रपटाची गरज आहे. त्यामुळे त्याने १९८६ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्याच ‘टॉप गन’ या चित्रपटाची निवड केली आहे. याच अ‍ॅक्शनपटाने टॉम क्रुज हा ताज्या दमाचा गुणी कलाकार हॉलीवूडला दिला होता. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी त्यावेळी या चित्रपटाची भरभरून स्तुती केली होती. हॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून नाव मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या टॉमला या चित्रपटाने ओळख मिळवून दिली होती. आता काळाची चक्रे पुन्हा उलटय़ा दिशेने फिरत आहेत. आपले हरवलेले सुपरस्टारडम शोधत टॉम पुन्हा याच चित्रपटापर्यंत येऊन पोहोचला आहे. म्हणूनच या चित्रपटाचा सिक्वल करायचा निर्णय त्याने घेतला असून त्याच्या पटकथेवर कामही सुरू केले आहे. लवकरच त्याचे चित्रीकरण सुरू होणार असून साधारणत: २०१९ च्या जुलैपर्यंत चित्रपट तयार होईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2017 3:50 am

Web Title: tom cruise top gun hollywood katta part 22
Next Stories
1 रिअ‍ॅलिटी शोमधील ‘बालजगत’ पुन्हा वादात?
2 आशा ‘ताई’!
3 पावसातलं नाटक!
Just Now!
X