हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज आपल्या धमाकेदार अॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटमालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. असाच एक धोकादायक स्टंट करताना टॉमचा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात त्याला फारशी दुखापत झाली नाही. परंतु कोट्यवधी रुपयांचा सेट मात्र जळून खाक झाला आहे. परिणामी लॉकडाउनच्या काळात निर्मात्यांना मोठं नुकसान झालं आहे.

 

View this post on Instagram

 

Kick it up a gear for movie night. Get the Mission: Impossible 6-movie Collection now on Digital and Blu-ray.

A post shared by Mission: Impossible (@missionimpossible) on

अभिनेता टॉम क्रूज ‘मिशन इम्पॉसिबल ७’ हा आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचं चित्रीकरण ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरु आहे. दरम्यान एका सीनमध्ये टॉमला बाईक चालवत एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारायची होती. हा स्टंट जवळपास ३० फूट उंचीवरुन केला जात होता. स्टंट करताना टॉमचा तोल आणि त्याच्या बाईकचा अपघात झाला. इतक्या उंचीवरुन चालती बाईक खाली पडल्यामुळे पेट्रोलची टाकी फुटली. दरम्यान त्या ठिकाणी आग लागली. या आगीमुळे जवळपास २५ टक्के सेट जळून खाक झाला. या अपघातात एक महागडा कॅमेरादेखील फुटला आहे. परिणामी निर्मात्यांना जवळपास २० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या अपघातामुळे ‘मिशन इम्पॉसिबल ७’चं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे.