News Flash

Top 10 News: मुस्लिम अभिनेत्रीच्या व्यथेपासून सलमान खानच्या काळवीट प्रकरणापर्यंत

वाचा मनोरंजन क्षेत्रातील बातम्या एका क्लिकवर

मुस्लिम असल्याने मुंबई राहण्यासाठी घर मिळत नसल्याची खंत टेलिव्हिजन अभिनेत्री शिरीन मिर्झाने व्यक्त केली आहे. एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत दिव्यांका त्रिपाठीची नणंद सिमीची भूमिका ती साकारत आहे. मुस्लिम, अविवाहित आणि अभिनेत्री असल्याचं कारण देत मला घर भाड्याने देत नसल्याचा संताप तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

शिरीनने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आल्यानंतर काढलेला पहिला फोटो तिने पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच तिने तिची व्यथा मांडली आहे. ‘मी मुंबई घर घेण्यास पात्र नाही कारण मी MBA आहे. MBA म्हणजेच मुस्लिम, बॅचलर आणि अॅक्टर. या तीन कारणांमुळे मला मुंबईत राहण्यासाठी घर मिळत नाहीये. मला दारू, सिगारेट यांसारखं कोणतंच व्यसन नाही. माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरीही लोक माझ्या चारित्र्यावर संशय कसा निर्माण करू शकतात? मी एखाद्या ब्रोकरला फोन केला तर अविवाहित असल्याचं कळताच ते घरभाडं वाढवून सांगतात. तर दुसरा व्यक्ती मी हिंदू आहे की मुस्लिम हे विचारतो. धर्माचा, अभिनेत्री असण्याचा किंवा विवाहित नसल्याचा घर भाड्याने देण्याशी काय संबंध आहे? मुंबईत येऊन मला आठ वर्षं झाली तरीही माझा संघर्ष सुरू आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मी या शहराची आहे की नाही?,’ असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं.

रामलीलामध्ये सीताची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रवि किशनचे असे बदलले नशीब

चित्रीकरणादरम्यान अभिनेत्रीवरच कुत्रा पिसाळला अन्…

VIDEO : ऑनस्क्रीन धोनीचं आलिशान घर पाहिलं का?

शेवटची दोन वर्षंच राहिली आयुष्याची- केआरकेचा धक्कादायक खुलासा

…म्हणून कंगना म्हणते, आयटम साँग नको रे बाबा!

पाकिस्ताननं लुडबूड करणं थांबवावं, मधुर भांडारकरने आफ्रिदीला सुनावले खडे बोल

अभिनेत्री तब्बूची जोधपूर विमानतळावर छेडछाड

Shikari Trailer: ऐन उन्हाळ्यात ‘हिट’ वाढवणारा ‘शिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर

सलमानला भेटण्यासाठी मुंबईत पळून आली १५ वर्षांची मुलगी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 9:23 pm

Web Title: top 10 entertainment news salman khan saif ali khan tabbu kamal r khan shikari marathi movie trailer shahid afridi madhur bhandarkar
Next Stories
1 सैफने ड्रायव्हरला फटकारले, ‘काच वर कर नाहीतर…’
2 मोबाइल अॅपद्वारे प्रदर्शित होणारा ‘हा’ पहिला मराठी चित्रपट
3 ५५वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव- २०१८ पुरस्कारांची घोषणा
Just Now!
X