News Flash

Top 10: धडक सिनेमाच्या प्रमोशनच्या चर्चेपासून संजूच्या स्क्रिनिंगला कलाकारांनी लावलेल्या हजेरीपर्यंत, सर्व काही एका क्लिकवर

इशान जान्हवीला प्रत्येक वेळी प्रोटेक्ट करताना दिसून येतो.

‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे नवोदित कलाकार इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची सध्या जोरदार चर्चेत असून त्यांचा चित्रपट येत्या २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून यातील ‘सैराट’ गाणं प्रेक्षकांच्या न उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील  जान्हवी-इशानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते चित्रपटगृहात गर्दी करतील यात शंका नाही. त्यातच या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु असून याला प्रेक्षक उत्स्फुर्ततेने प्रतिसाद देत आहे. त्यामुळे इशान आणि जान्हवी सतत सोबत दिसत असून इशान जान्हवीला प्रत्येक वेळी प्रोटेक्ट करताना दिसून येतो.

काही दिवसापूर्वी ‘धडक’चं प्रमोशन करण्यासाठी इशान-जान्हवीच्या जयपूरमधील एका मॉलमध्ये पोहोचले होते. या दोघांना पाहताच चाहत्यांनी त्यांच्या भोवती प्रचंड गदारोळ निर्माण केला. काही उत्साही चाहत्यांनी तर जान्हवी बरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारामुळे जान्हवी गांगरुन गेली होती. मात्र इशान जान्हवीला प्रोटेक्ट करताना दिसून आला.

जान्हवीचे अंगरक्षक तिचा बचाव करत असूनही चाहत्यांना रोखणं त्यांना शक्य होत नव्हतं.त्यामुळे इशान सतत जान्हवीच्या बाजूने चालत तिला चाहत्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता. करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमधून  संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. या चर्चा रंगत असतानाच ‘संजू’च्या स्क्रिनिंगच्याही चर्चा रंगत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ‘संजू’च्या चर्चेमागचं कारण आणि बी-टाऊनच्या अन्य चर्चांविषयी….

Sanju Movie: ‘या’ कलाकारांनी लावली ‘संजू’च्या स्क्रिनिंगला हजेरी !

सलमान-रणवीरची जोडी दिसणार ‘धूम ४’ मध्ये?

Video : ..म्हणून ‘सुई-धागा’च्या सेटवरुन अनुष्का-वरुणने काढला पळ

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये राहुल गांधींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

VIDEO : अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

…म्हणून सलमानचा प्रेमावर नाही विश्वास!

‘डॉन’मधील ‘त्या’ गाण्यावर बिग बींनी केला मोठा खुलासा!

‘सियाप्पा’मुळे जुळतील का सोनम-राजकुमारचे सुत?

‘वीरे दी वेडिंग’मधील हस्तमैथूनाच्या दृश्याविषयी रणबीरची प्रतिक्रिया ऐकली का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 6:20 pm

Web Title: top 10 ishaan khatter protected janhvi kapoor dhadak promotions
Next Stories
1 Satyamev Jayate Trailer: ‘दो टके की जान लेने के लिए ९ मिलीमीटर की गोली नही, ५६ इंच का जिगरा चाहिए’
2 VIDEO : अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
3 …म्हणून सलमानचा प्रेमावर नाही विश्वास!
Just Now!
X