News Flash

झीटॉकीज घेऊन येत आहे खास १० चित्रपट

जुलैमध्ये पाहाचित्रपट महोत्सव

या मान्सूनमध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. या पावसाळ्यात झी टॉकीज तुमच्या भेटीस घेऊन येत आहे मागील दशकातील तुमच्या आठवणींशी जोडणारे खास १० ब्लॉकबस्टर चित्रपट. लॉकडाउनमध्ये जुन्या चित्रपटांचा ट्रेंड वाढत असताना, यामध्ये भर घालण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे एक खास फिल्म फेस्टिवल “दशकातले दहा जुलै मध्ये पहा”.

६ जुलै रोजी अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘काकस्पर्श’ हा ८ जुलै रोजी  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘रंपाट’ हा चित्रपट ९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १० जुलै रोजी हा चित्रपट झीटॉकीजवर प्रदर्शित होणार आहे. ‘नाळ’ हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘लय भारी’ १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.

‘नशीबवान’ हा चित्रपट १५ जुलै रोजी. २०१५ साली देऊळ बंद या चित्रपटाद्वारे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनात प्रदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिका साकारत असून मोहन जोशी, दीपक करंजीकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. १६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवलची  सांगता १७ जुलै  रोजी  एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाने होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:23 pm

Web Title: top 10 marathi movies will be showen on zee talkies avb 95
Next Stories
1 यशस्वी भव:! लता मंगेशकरांनी ‘या’ अज्ञात गायिकेला दिला आशीर्वाद
2 ‘राहुल गांधी परीक्षेतही कॉपी करुन पास झाले ‘; अशोक पंडितांचे टीकास्त्र
3 Video : मुक्ताला अशी मिळाली ‘घडलंय बिघडलंय’ची ऑफर
Just Now!
X