16 December 2017

News Flash

Top 10 News: कलाकारांच्या मानधनाच्या गणितापासून ते कंगनाकडे होणाऱ्या दुर्लक्षापर्यंत सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

मिलिंद सोमण चर्चेत आला ते म्हणजे त्याच्या १८ वर्षीय प्रेयसीमुळे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 12:45 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

अभिनेता आमिर खान सिक्रेट सुपरस्टार या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमात त्याने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा करत त्याने कलाकारांच्या मानधनाचं गणितही सर्वांसमोर उलगडलं. प्रत्येक कलाकाराला त्यांच्या लोकप्रियतेच्या आधारे मानधन मिळालं पाहिजे हा मुद्दा त्याने मांडला. यावेळी त्याने मानधनाची बरीच गणितंसुद्धा मांडली. एक निर्माता म्हणून मानधनाच्या या गणितांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही त्याने यावेळी सर्वांसमोर ठेवला. ‘तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष किंवा प्राणी, मला याने काहीच फरक पडत नाही. एक निर्माता म्हणून तुम्ही मला नफा मिळवून देत असाल तर मी त्यासाठी तुम्हाला नक्कीच जास्त मानधन देईन’, असं आमिर म्हणाला.

आमिरव्यतिरिक्त इतरही बऱ्याच घडामोडी कलाविश्वात घडल्याचं पाहायला मिळालं. ज्यामध्ये भैरवी गोस्वामी, मिलिंद सोमण, कंगना रणौत चर्चेत होते. मिलिंद सोमण बऱ्याच दिवसांनी चर्चेत आला ते म्हणजे त्याच्या १८ वर्षीय प्रेयसीमुळे. चला जाणून घेऊया कोण आहे त्याची प्रेयसी आणि काय होत्या चित्रपट विश्वातील इतर घडामोडी याविषयी…

‘काम मिळवण्यासाठी अभिनेत्री ‘हे’ पाऊल उचलतात; १० वर्षांनी त्यालाच विनयभंगाचे नाव देतात’

५१ वर्षीय मिलिंद सोमणने १८ वर्षीय प्रेयसीसोबत शेअर केला फोटो

मसाबा गुप्तावर नेटकऱ्यांची शेलक्या शब्दांत टीका; सोनम कपूर आली मदतीला

हृतिकमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कंगनाची टाळाटाळ

उबर चालकाने अभिनेत्रीला शिवीगाळ करुन दाखवला बाहेरचा रस्ता

PHOTO : इनायासोबत कुणालचे सुरेख क्षण

तैमुरचे व्हायरल फोटो काढण्यामागे आहे ‘या’ व्यक्तीचा हात

‘बजरंगी भाईजान’मध्ये काम करण्यास नकार दिला म्हणून सलमानची कंगनाला शिवीगाळ

जॅकी चॅनची ‘ही’ मुलगी लेसबियन

First Published on October 13, 2017 12:45 pm

Web Title: top 10 news aamir khan kangana ranaut milind soman bollywood marathi gossip news