ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी ‘चहावाला, बारवाला’ विषयीचे आक्षेपार्ह ट्विट काल डिलीट केले. इंडियन युथ काँग्रेसच्या ‘युवा देश’ या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह ट्विटला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘चहावाला’ ट्विटच्या वादात रावल यांचे नाव चर्चेत आले होते.

नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्यानंतर रावल यांनी ‘युवा देश’च्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत एक प्रतिक्रिया दिली होती. पण, त्यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसवर निशाणा साधत रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘आमचा चहावाला तुमच्या बारवाल्याच्या वरचढ आहे.’ हे ट्विट सोशल मीडियावर पोस्ट करताच अनेकांनी रावल यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली.

‘चहावाला, बारवाला’ ट्विट डिलीट करत परेश रावल यांनी मागितली माफी

मिस वर्ल्ड मानुषीवर होणार ‘या’ बक्षिसांची बरसात?

‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला

स्वत:च्या लग्नासाठी या अभिनेत्याने उघडली ‘मॅट्रिमोनियल साइट’

सुयश, अक्षयाच्या आयुष्यातील ‘बापमाणूस’ माहितीये का?

जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

आयुष्यात अशा गोष्टी घडतच असतात; पत्नीपासून विभक्त होण्याविषयी किरणची प्रतिक्रिया

Padmavati controversy: चित्रपट न पाहताच निदर्शने करु नका- नाना पाटेकर

पद्मावती वाद: ‘अमिताभ, आमिर, शाहरुख, मोदीचे मौन का?’

स्टारडममुळेच दीपिकाने गमावला ‘हा’ चित्रपट