News Flash

Top 10 News: अमिताभ बच्चन यांच्या घरातील दिवाळी पार्टीपासून ते रितेश देशमुखच्या ‘फास्टर फेणे’पर्यंत, वाचा सर्व घडामोडी एका क्लिकवर

बच्चन कुटुंबियांनीही एका वर्षाचा दुखवटा पाळला आहे

अमिताभ बच्चन यांच्या घरची दिवाळी पार्टी नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण यंदा बच्चन कुटुंबीय कोणतेच सण साजरे करणार नाहीत. याचे कारण म्हणजे याच वर्षी मार्च महिन्यात ऐश्वर्या राय बच्चनचे वडिल कृष्णराज राय यांचे कर्करोगाने निधन झाले. राय कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत बच्चन कुटुंबियांनीही एका वर्षाचा दुखवटा पाळला आहे. दमदार दिवाळी पार्टीऐवजी बच्चन कुटुंब एकमेकांसोबत वेळ घालवणार आहेत. दिवाळी पार्टीच काय तर अमिताभ यांनी आपला वाढदिवसही जल्लोषात साजरा केला नाही. बिग बींच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंब मालदीवला गेले होते. वडील कृष्णराज राय कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण कर्करोग बळावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याव्यतिरिक्त बऱ्याच घडामोडी कलाविश्वात घडत आहेत. हरियाणातील गायिका हर्षिता दलियाची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून आरोपी अजूनही फरार आहेत. शिवाय टायगर जिंदा है सिनेमाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. चला तर मग, जाणून घेऊ मराठी आणि बॉलिवूड विश्वातील इतर घडामोडी…

‘अजूनपर्यंत त्याने लग्न केले नाही कारण तो नामर्द आहे’

मादाम तुसाँ संग्रहालयात वरुण धवनचा पुतळा

मुलगा- मुलगी एकत्र फिरण्यात गैर काय?- माहिरा खान

…म्हणून कपिल त्याच्या सिनेमाचे प्रमोशन टीव्हीवर करणार नाही

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा ठरली ‘सेक्सिएस्ट वुमन अलाइव्ह’

‘टायगर’ची पहिली झलक पाहिली का?

हरियाणातील गायिका हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या

होय, माझंही लैंगिक शोषण झालं होतं; ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

‘तुमच्या यशाला समजून घेणारा जोडीदार मिळणं कठीण’

विराटने शेअर केली ‘फॅनबॉय मुमेंट’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 9:32 am

Web Title: top 10 news bollywood marathi industry news amitabh bachchan salman khan riteish deshmukh
Next Stories
1 ‘या’ दोन व्यक्तींनी सिद्धार्थ- आलियाला आणलं एकत्र
2 काजोलचा मुलगा ‘ब्रह्मास्त्र’साठी करण जोहरसोबत करणार काम
3 आमिर- अजयसोबत ‘हा’ कपूरसुद्धा तुमच्या भेटीला येतोय
Just Now!
X