तब्बल १० वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा बॉलिवूडकडे वळली आहे. आगामी ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात ती बेवफा ब्यूटी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. उद्या २३ मार्चला हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना उर्मिलाच्या या गाण्याची उत्सुकता असतानाच मनोरंजन विश्वात आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा झाली, ती म्हणजे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान हिच्याबद्दल. सोशल मीडियावरील ट्रोलिंगला वैतागून हिनाने चक्क तिचा ट्विटर अकाऊंट डिलीट करणार असल्याचा इशारा चाहत्यांना दिला आहे. इन्टाग्राम लाइव्हदरम्यान तिने याबद्दल वक्तव्य केलं असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. याव्यतिरिक्त दिवसभरातील मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी…