सध्या चित्रपटसृष्टीत कोणत्या संगीतकार जोडीची सर्वांत जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे अजय- अतुल. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाला त्यांनी दिलेल्या संगीताने सर्वांनाच ‘याड लावलं’. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांमध्ये संगीत देण्याचे बऱ्याच ऑफर्सही या जोडीला मिळू लागल्या. आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर सैराटचा हिंदी रिमेक ‘धडक’मध्येही ते संगीत देणार असल्याची माहिती होती. हे दोन मोठे प्रोजेक्ट हातात असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा चित्रपट अजय- अतुलला मिळाला आहे. आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटासाठी अजय- अतुल संगीत देणार असल्याची माहिती ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिली आहे.

या चित्रपटासाठी आधी संगीतकार अमित त्रिवेदीची निवड करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अमितने निर्मात्यांना गाण्यांच्या काही चालीसुद्धा सुचवल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव अमितने यातून माघार घेतली आणि आता त्याच्या जागी अजय- अतुलची वर्णी लागली.

शाहरुखच्या चित्रपटातून अमित त्रिवेदीची माघार, अजय-अतुलकडे जबाबदारी

PHOTO : झहीर- सागरिकाच्या लग्नाचा पहिला फोटो

रस्त्यात सेल्फी काढल्याबद्दल मुंबई पोलिसांचा वरुण धवनला दंड

..जेव्हा मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स एकत्र येतात

’तुझ्यात जीव रंगला’च्या चित्रीकरणामधील काही भाग लीक

‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

अरेच्चा, ही तर स्वानंदी!

दोन वर्षांपूर्वी अशी दिसायची ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर

PHOTO : झहीर-सागरिकाची लग्नपत्रिका पाहिलीत का?

राजपूत संघटनांनी बाहुबलीला सांगितले पद्मावतीचा विरोध कर, पण…