News Flash

Top 10 News : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील वादांपासून ‘ऑक्टोबर’च्या वाटेतील अडचणीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

या घरात दर दिवसाआड एका नव्या वादाला तोंड फुटण्यासही सुरुवात झाली आहे. हे वाद आणखी किती चिघळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कुतूहल लागून राहिलं आहे.

टॉप १०

वादग्रस्त कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या नावाचासुद्धा अवघ्या फार कमी वेळातच समावेश झाला आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच प्रत्येक सेलिब्रिटीविषयी प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे या घरात दर दिवसाआड एका नव्या वादाला तोंड फुटण्यासही सुरुवात झाली आहे. मग ते घराचं नेतृत्व कोणाकडे असणार हा मुद्दा असो किंवा कोणाची भाषा कशी आहे त्यावरुन केलेलं वक्तव्य असो.

सध्याच्या घडीला या घरात अनिल थत्ते यांच्याविषयी अनेकांचं फारसं चांगलं मत नसल्याचं दिसत असून, काही वादाही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्येही मेघा आणि आरती या स्पर्धकांनी अनिल थत्ते यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये हे वाद आणखी किती चिघळणार हे पाहण्यासाठीच प्रेक्षकांमध्ये कुतूहल लागून राहिलं आहे. बिग बॉस मराठीच्या नवनवीन चर्चांव्यतिरिक्त आणखीही बऱ्याच गोष्टी कलाविश्वात प्रकाशझोतात राहिल्या. चला तर मग नजर टाकूया अशाच काही बहुचर्चित गोष्टींवर….

Bigg Boss Marathi: कोण असेल बिग बॉस मराठीच्या घरचा नवा कॅप्टन?

एप्रिलमध्येच वरुणच्या ‘ऑक्टोबर’ला ग्रहण; मराठी चित्रपटावरून कॉपी केल्याचा आरोप

‘मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज होईन, पण….’

अभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिका, विराट कोहली !

‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार

सुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम

शाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप

मी शाहरुखचा ‘स्वदेस’ पाहिलाच नाही- आमिर खान

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 7:44 pm

Web Title: top 10 news marathi bigg boss october movie kapil sharma gossip bollywood
Next Stories
1 Bigg Boss Marathi: अनिल थत्ते यांच्यावर का चिडल्या मेघा धाडे आणि आरती?
2 VIDEO : ग्रामीण प्रेमकथेचा दरवळ असणाऱ्या ‘वंटास’चा ट्रेलर पाहिला?
3 ‘मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज होईन, पण….’
Just Now!
X