News Flash

TOP 10 NEWS : नाना पाटेकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यापासून ‘पद्मावत’पर्यंत

रागवण्याने कोणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा प्रेक्षक होता, आज आहे आणि उद्याही असेल

राज ठाकरे, नाना पाटेकर

सध्या अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या आगामी ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत नानांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी एक भावनिक वक्तव्य करत अनेकांचेच लक्ष वेधले. ‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही. त्यावेळी मी रागात बोललो होतो. रागवण्याने कोणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा प्रेक्षक होता, आज आहे आणि उद्याही असेल’, असे नाना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांविषयी मांडलेल्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर या दोघांमध्येही वादाची ठिणगी पडल्याचेही म्हटले गेले. पण, त्यावेळी आपण फक्त आपल्याला योग्य वाटले तेच वक्तव्य केले, असे मत मांडत नानांनी झाला वाद मोडित काढला. राजकीय मंच वेगळा आणि कलाकारांचा मंच वेगळा आहे, असे म्हणत नानांनी राजसोबत असलेल्या मित्रत्त्वाच्या नात्याची वेगळी बाजू सर्वांसमोर ठेवली.

‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही’

‘पद्मावत’ नव्हे तर ‘या’ गोष्टींवर बंदी आणा; रेणुका शहाणेंच्या पोस्टने वेधले लक्ष

राजकारणातील प्रवेशाचा रजनीकांत यांनी गांभीर्याने विचार करावा- नाना पाटेकर

साऊथच्या सुपरस्टारशी लग्नानंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड

उर्वशी रौतेलावर शेलक्या शब्दांत टीकेची झोड, नेटकऱ्यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा

तुझ्यासारखा तूच; रणवीरच्या अतरंगी कपड्यांवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

भिलवाड्याच्या ‘वीरु’ची मोबाईल टॉवरवर चढून ‘पद्मावत’ बंदीची मागणी

प्रभासची लगीनघाई; काकांनी दिले संकेत

BLOG : चित्रपटाच्या नावातील बदलाचा खेळ, ‘जागीर’ चा झाला ‘जा गीर’

दिल्लीत पोलिसांवर भारी पडली करणी सेना; तोडफोड सत्र सुरूच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 9:51 am

Web Title: top 10 news nana patekar to padmavat bollywood marathi gossip news
Next Stories
1 ‘पद्मावत’मधील श्रेया घोषालच्या तीन गाण्यांना कात्री
2 अखेर करणी सेना प्रदर्शनापूर्वी पाहणार ‘पद्मावत’
3 ‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही’
Just Now!
X