28 October 2020

News Flash

TOP 10 NEWS : प्रियांकाच्या कमिटेड रिलेशनशीपपासून दीपिकाने वडिलांना दिलेल्या गिफ्टपर्यंत..

काही व्यक्तींसोबत मी वेळ व्यतीत केला, त्यांच्यासोबत बाहेरही गेले.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा परदेशी कलाविश्वात आपलं नशिब आजमवण्यासाठी गेली आणि तिकडचीच झाली. सध्याच्या घडीला प्रियांका तिचा जास्तीत जास्त वेळ परदेशातच व्यतीत करते. ‘क्वांटिको’ या एका मालिकेमुळे परदेशातील घराघरात पोहोचलेल्या प्रियांकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आंतरराष्ट्रीय कलाविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या ‘देसी गर्ल’च्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा मध्यंतरी बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या.

प्रियांका कोणाला डेट करते, कोणासोबत कुठे जाते या साऱ्याविषयी सोशल मीडियावरही बरेच फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. किंबहुना काही परदेशी कलाकारांसोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रियांकाने नुकताच एका मुलाखतीत अतिशय महत्त्वाचा खुलासा केला. ‘मी जोडीदाराशी प्रामाणिक असणाऱ्यांपैकी एक आहे. हो… मी एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते. पण, जवळास एक वर्षापासून मी एकटीच (सिंगल) आहे. काही व्यक्तींना मी भेटले. काही व्यक्तींसोबत मी वेळ व्यतीत केला, त्यांच्यासोबत बाहेरही गेले. पण, अजूनही मी माझे भान हरपलेले नाही’, असं प्रियांका ‘फिल्मफेअर’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

‘हो.. मी कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते’

फ्लॅशबॅक : एक नाना असादेखिल…

महिलांशी गैरवर्तणूक करणारा कलाकार अडचणीत

‘बीच वेडिंग’साठी रणवीर- दीपिका सज्ज?

‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून विकण्यासाठी त्यांनी मॉडेलला सुटकेसमध्ये भरलं अन्…

अंगावर बूट फेकणाऱ्या त्या तरुणाविषयी तमन्ना म्हणते..

‘विरुष्का’ला मिळालं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चं अनोखं गिफ्ट

‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे

102 Not Out Teaser: २७ वर्षांनंतर दिसणार अमिताभ आणि ऋषींची अनोखी केमिस्ट्री

दीपिका पदुकोणने वडिलांना दिले हे खास गिफ्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 11:53 am

Web Title: top 10 news priyanka chopras commited relationship to deepika padukone gifted car her dad bollywood marathi gossip news
Next Stories
1 ‘जंगली’ चित्रपटाच्या सेटवर विद्युत जामवाल जखमी
2 आणि तो परत येतोय…
3 …अन् चक्क रणवीर सिंगने मुलीचे जॅकेट घातले
Just Now!
X