बिग बजेट चित्रपटासाठी महत्त्वाचे सर्व निकष आणि त्यासाठी लागणारी कलाकारांची फळी या सर्व गोष्टींची जुळवाजुळव करण्याची कला भन्साळींना चांगलीच अवगत आहे. याचाच प्रत्यय ‘पद्मावत’ मधून आला. राजपूत संस्कृती आणि एका काल्पनिक कथानकाची साथ घेत साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. दीपिकाने साकारेली राणी पद्मावती, रणवीरने साकारलेला क्रूर सुलतान अलाउद्दीन खिल्जी आणि शाहिदने साकारलेला महारावल रतन सिंह या मुख्य भूमिकांमध्ये बाजी मारली ती म्हणजे रणवीर सिंगने.

रणवीरने अलाउद्दीन खिल्जी इतक्या ताकदीने साकारला की, अनेकांनाच सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या क्रूरतेविषयी तर्क लावणे सोपे झाले. मुळात खिल्जी खरंच इतका क्रूर होता का, हा प्रश्न राहून राहून अनेकांच्या मनात घर करत होता. ‘इंडिया टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आपल्या याच भूमिकेविषयी सांगताना एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता, ‘माझा मेंदू आणि शरीर अगदी पिळवटून निघाले होते. माझ्या स्नायूंमध्ये कोणत्याच संवेदना नव्हत्या. तरीही मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होतो. पण, मुळात मी आतून पूर्ण तुटलो होतो. काही प्रसंगी तुम्ही खंबीर असणे गरजेचेचे असते आणि त्यावेळी मग तुम्ही झपाटल्यासारखे काम करता. मीसुद्धा अगदी तसेच केले. माझ्याकडून शक्य त्यापरिने मी स्वत:ला या भूमिकेत झोकून दिले. खिल्जीमध्ये असणारी क्रूरता मी माझ्या अंगी बाणवली होती. अनेकदा तर माझ्या स्वत:च्या दृष्टीने हानिकारक असणाऱ्या गोष्टीही मला कराव्या लागल्या.’

‘या’ गोष्टी वाचून खिल्जी साकारणाऱ्या रणवीरबद्दलचा आदर आणखीनच वाढेल

ट्विटरवरुन ‘एक्झिट’ घेण्याचा बिग बींचा निर्णय?

पत्नीच्याच घरी अभिनेत्याने केली चोरी

पद्मावतीच्या सौंदर्याला खिल्जीच्या पत्नीने दिली टक्कर

दंगल अजून सुरूच आहे..

सेलिब्रिटी लेखक: शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी!

PHOTO : ‘व्हेंटिलेटर’ फेम सुमेधचे ‘हॉट डुड ट्रान्सफॉर्मेशन’

प्रिन्स हॅरी, मेगन मार्कलच्या विवाहसोहळ्यात प्रियांकाला मिळणार ‘तो’ मान?

तिने डिस्क्लेमर पाहिले नसेल, दीपिकाचा स्वराला टोला

नाते आमुचे प्रेमाचे..!