23 November 2020

News Flash

Top 10 News: वाचा सलमान खानशी निगडीत दिवसभरातील सर्व बातम्या

१- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते.

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

न्यायमूर्ती खत्री यांनी सलमान खानला दोषी ठरवले. तर उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे,नीलम, तब्बू आणि सैफ अली खान या सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने या सर्वांना दोषमुक्त केले. सलमानच्या शिक्षेबाबत दुपारपर्यंत युक्तिवाद झाला. सलमानच्या शिक्षेबाबतही आज (गुरुवारी) युक्तिवाद झाला. दुपारी न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

बॉलिवूडचा ‘टायगर’ आजची रात्र जेलमध्ये काढणार

सलमानचे जोधपूर तुरुंगातील फोटो पाहिलेत का?

सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टरही त्याच तुरुंगात!

तुरूंगात जाताना सलमानच्या बहिणीने दिल्या त्याला या दोन गोष्टी

पुनमचंद बिष्णोईंची लघुशंका सलमानला पडली महागात

दोषी ठरला सलमान, शिक्षा मात्र निर्मात्यांना

‘काळवीटांनी आत्महत्या केली नाही हे सिद्ध करायला २० वर्षे लागली’

सलमानला पाठिंबा दर्शवण्यासाठी कलाकारांनी घेतली ट्विटरची मदत

सलमानला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर जया बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख

सलमानला न्याय मिळाला नाही, नीलमच्या नवऱ्याची प्रतिक्रिया

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 7:35 pm

Web Title: top 10 news salman khan black buck poaching case full day development
Next Stories
1 ‘देवाची इच्छा असेल तर नक्की एकत्र काम करू’
2 तुरूंगात जाताना सलमानच्या बहिणीने दिल्या त्याला या दोन गोष्टी
3 सलमानचे जोधपूर तुरुंगातील फोटो पाहिलेत का?
Just Now!
X