25 November 2020

News Flash

सुशांतसिंह मृत्यूप्रकरण: ड्रग चॅट्समधून बॉलिवूडच्या पाच टॉप कलाकारांची नावं उघड?

श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत यांची या आठवड्यात चौकशीची शक्यता

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग प्रकरणातील चॅटिंगमधून आता बॉलिवूडमधील टॉप पाच कलाकारांची नावं कथित स्वरुपात समोर आली आहेत. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिलं आहे.

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) चौकशी करीत असलेल्या या ड्रग संदर्भातील चॅटिंगमधून बॉलिवूडमधील पाच टॉपच्या कलाकारांच्या नावांची अद्याक्षरं समोर आली आहेत. यामध्ये K, D, S, N आणि J ही अद्याक्षरं आहेत. यामध्ये ‘K’ हा ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, ‘D’ हा टॉप कलाकार जो करन जोहरच्या पार्टीतील व्हिडिओत दिसला होता. ‘S’ म्हणजे अभिनेत्री श्रद्ध कपूर, ‘N’ हा ९०च्या दशकातील अभिनेता. ‘J’ म्हणजे जया शाह ही नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याच प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत कौर यांना या आठवड्यात चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावलं जाऊ शकतं. एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीने या अभिनेत्रींची नावं घेतली होती. रियाला ९ सप्टेंबर रोजी सुशांतला ड्रग्ज दिल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.

२८ वर्षीय अभिनेत्री रिया चक्रवर्तीशिवाय या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या अन्य लोकांमध्ये तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतसिंह राजपूतचे दोन कर्मचारी आणि बॉलिवूडशीसंबंधित दोन ड्रग डीलर्स यांचा समावेश आहे. एनसीबीनं अटक केल्यानंतर तीन दिवसांच्या चौकशीत रियाने ड्रग्ज खरेदीसंबंधी सुशांतचे सहकलाकार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 7:12 pm

Web Title: top 5 bollywood actors names revealed in drug chats over sushant singhs death case aau 85
Next Stories
1 “महान राष्ट्रीय नेत्या कंगना रणौत यांच्या सांगण्याप्रमाणे…”; माजी केंद्रीय मंत्र्याचा टोला
2 “भाजपाने लोकशाहीची हत्या केली, तरी आम्ही झुकणार नाही, आम्ही…”; ममता बॅनर्जी संतापल्या
3 करोनाला हरवण्यात भारतीय अव्वल, रिकव्हरी रेट ८० टक्यांपेक्षा जास्त
Just Now!
X