‘संजू’ चित्रपटानं कामाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. ३०० कोटींची कमाई करणारा हा २०१८ मधला दुसरा चित्रपट ठरला आहे. पण याआधी ६ चित्रपटांनी ३०० कोटींची यशस्वी कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. हे चित्रपट कोणते ते पाहुयात.

पिके
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पिके’ या चित्रपटानं ३०० कोटींहून अधिकची यशस्वी कमाई केली. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. आमिर खान, सुशांत सिंग राजपुत आणि अनुष्का शर्मा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. ‘पिके’ या चित्रपटाला चीनमध्येही तुफान प्रतिसाद लाभला होता.

बजरंगी भाईजान
कबीर खान दिग्दर्शित आणि सलमान खानची प्रमुख असलेला ‘बजरंगी भाईजान’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. भारतासह जगभरात या चित्रपटानं ९५० कोटींची कमाई केली. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा सलमान खानचादेखील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले.

सुलतान
अली अब्बास जाफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आहे. अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे.  सलमानच्या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘टायगर झिंदा है’ चित्रपटानंदेखील यशस्वी कमाई केली होती.

दंगल
या चित्रपटानं  चीनमध्ये १४०० कोटींची बक्कळ कमाई केली होती. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कुस्तीपटू फोगट कुटुंबावर आधारित आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतात ३८७ कोटींहून अधिकची कमाई केली होती.

पद्मावत
वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पद्मावत हा सिनेमा ३०० कोटींचा गल्ला पार करणारा २०१८ मधला पहिलाच चित्रपट ठरला. या चित्रपटानं जगभरात ५०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. दीपिका पादुकोन, रणवीर सिंग, शाहीद कपूरची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती.