टॉम क्रुज हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर ‘मिशन: इम्पॉसिबल’, ‘रेन मॅन’, ‘रिस्की बिझनेस’, ‘मंगोलिया’, ‘नाइट अ‍ॅण्ड डे’, ‘द लास्ट समुराई’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांतून एक उत्तम अभिनेता म्हणून जगभरात नावलौकिक मिळवला आहे. परंतु अलिकडच्या काळात टॉमच्या वर्चस्वाला काहीशी उतरती कळा लागली आहे. त्यामुळे आता वयाच्या ५७ व्या वर्षी अभिनयात तो तीच जुनी धार दाखवू शकेल का? याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. परंतु आपल्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी तो ‘टॉप गन: मेव्हरिक’ या आगामी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
ketu guru navpancham yog
गुरू आणि केतुची लवकरच होईल युती! नवपंचम राजयोगामुळे या राशींना लाभेल भाग्यची साथ, मिळेल भरपूर पैसा
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. जबरदस्त अॅक्शन सीन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये टॉम दुचाकीवरुन विमानाशी शर्यत करताना दिसत आहे. हा चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात त्याने अमेरिकन एअर फोर्समध्ये काम करणाऱ्या एका फायटर पायलटची भूमिका साकारली होती.

ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणारा ‘टॉप गन’ टॉम क्रुजच्या सिनेकारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने टॉमला तत्कालीन सुपरस्टार अभिनेत्यांच्या पंक्तित स्थान मिळवून दिले होते. आता तब्बल ३४ वर्षानंतर त्या सुपरहिट टॉप गनचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘टॉप गन: मेव्हरिक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जोसेफ कोसिन्की यांनी केले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी जुन महिन्यात प्रदर्शित होणार आहे.