मालिका या प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहे. मालिकांमध्ये दरआठवड्याला येणारे नवनवे ट्विस्ट हे प्रेक्षकांना खिळवून ठेवत असतात. दरआठवड्याला या मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवरच मालिकेची लोकप्रियताही ठरली असते. या लोकप्रियतेवरून मालिकेचा टीआरपी किती हे ठरतं. हा टीआरपी दर आठवड्याला कमी जास्त होत असतो आणि दरआठवड्याला याच टीआरपीच्या आकड्यावरून कोणती मालिका वरचढ ठरली हे कळतं.

तर गेल्या आठवड्यातील BARC आकडेवारीनुसार यावेळीदेखील राधिका, गुरू अन् शनायाची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका वरचढ ठरली आहे. गेल्या महिन्याभरापासून टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल आहे. त्यातून शनायाच्या आईनं या मालिकेत एण्ट्री घेतल्यानंतर या मालिकेनं पुन्हा एकदा रंजक वळण घेतलं आहे.

पाठकबाई, राणादाची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका टीआरपीच्या यादीत आपलं दुसरं स्थान कायम टिकवून आहे. झी मराठीवरच प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकेनं ‘तुला पाहते रे’ या मालिकेला गेला आठवड्यातही मागे टाकलं होतं. तर विक्रांत सरंजामे, इशाची ‘तुला पाहते हे रे’ मालिका अजूनही तिसऱ्या स्थानावरच आहे. या मालिकेत आलेली वेगवेगळी वळणं मालिकेचं लोकप्रियतेच्या यादीत असलेलं तिसरं स्थान बदलायला अपयशी ठरलं आहे. अल्पावधीतच ही मालिका झीवरची लोकप्रिय मालिका ठरली होती. मात्र डिसेंबर पासून या मालिकेचा टीआरपी घसला आहे.

BARCनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मालिकांच्या यादीत झी मराठीच्या ५ मालिकांचा समावेश आहे. या यादीत चौथ्या स्थानावर ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका आहे. तर पाचव्या स्थानी उत्सव आनंदाचा हा शो होता.