मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘सैराट’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गाण्यांपाठोपाठ चित्रपटाच्या ट्रेलरलाही रसिकांनी तुफान प्रतिसाद दिल्यामुळे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱया या चित्रपटाबाबतची रसिकांमधील उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. ‘फॅन्ड्री’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेचा हा दुसरा चित्रपट. चित्रपटातील अजय-अतुलच्या गाण्यांनी प्रेक्षकांना याआधीच ‘याडं लावलं’ आहे. याशिवाय, सोशल मीडियावरची सध्या ‘सैराट’चीच जादू पाहायला मिळत आहे. हा चित्रपट का पाहावा याबद्दलची १७ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ती १७ कारणे पुढीलप्रमाणे…

‘सैराट’ बघण्याची १७ कारणे- 

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

1) जगभर गाजलेला ‘फँड्री’ बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट
2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत
3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात २०१६ मधील एकमेव मराठी चित्रपट
4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट
5) हॉलीवुड मधे संगीत रेकॉर्डिंग झालेला ‘सैराट’ हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट
6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला
7) ‘पिस्तुल्या’ , ‘फँड्री’ आणि आता ‘सैराट’ या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे
8) नवख्या नॉन-एक्टर पोरांना घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक
9) आतापर्यंत प्रदर्शित झालेले अत्यंत दर्जेदार टीजर व गाण्यांचे प्रोमो, ट्रेलर
10) आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टीला गवसलेला योग्य वयातील हिरो
11) खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक भाषेचा वापर करणारा दिग्दर्शक उदा: फँड्री, सैराटचे टीजर आणि गाण्याचे प्रोमो
12) जातिभेदाचे विषमतेचे चटके सोसत तळा गाळातून जीवघेणा संघर्ष करीत वर आलेल्या व तरीही कोणाबद्दल द्वेष वा मनात विखार न बाळगणाऱ्या माणसाची अभिव्यक्ति- ‘सैराट’
13) प्रखर सामजिक भान असणाऱया माणसाची कलाकृती
14) जातीपातीला विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारा दिग्दर्शक
15) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा दिग्दर्शक
16) नागराज पोपटराव मंजुळे – बस नाम ही काफी है फ़िल्म देखने के लिए
17) कुठल्याही जातिपातीच्या चौकटीत न अडकता माणूस म्हणून उन्नत भूमिका मांडणाऱ्या माणसाची कलाकृती.