28 November 2020

News Flash

‘तोरबाज’च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त ‘मसीहा’च्या भूमिकेत

चित्रपटात संजय दत्तची महत्त्वाची भूमिका

संजय दत्त आणि नर्गिस फाकरी या दोघांचा तोरबाज हा सिनेमा ११ डिसेंबरला नेटफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होतो आहे. हा सिनेमा गिरीश मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे. संजय दत्तने माजी आर्मी डॉक्टर नसीर खान हे पात्र साकारलं आहे. अफगाणिस्तानच्या रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलांना क्रिकेट शिकवण्याचं काम तो करताना दिसतो आहे. अफगाणिस्तानमधल्या रेफ्युजी कॅम्पच्या मुलांना कसं सुसाईड बॉम्ब बनवलं जातं आणि संजय दत्त मसीहा बनवून त्यांना कसं बदलतो याचं चित्रण या सिनेमात आहे. अशी काहीशी कथा या सिनेमात आहे असं ट्रेलरवरुन दिसतं आहे. हा ट्रेलर आजच रिलिज झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा ११ डिसेंबरला भेटीला येणार आहे.

रेफ्युजी कॅम्पमधली मुलं दहशतवादी नसतात तर दहशतवादाची पहिली शिकार होतात या आशयाचा एक संवाद या सिनेमात संजय दत्तच्या तोंडी आहे. रेफ्युजी कॅम्पमधल्या मुलांना संजय दत्त कसं प्रशिक्षण देतो त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी कसं तयार करतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात राहुल देव हा अभिनेता मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. लहान मुलंही सुसाइड बॉम्ब होण्यासाठीच आहेत अशी त्याची धारणा असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. तर नर्गिस फाकरीने एका अफगाणी महिलेचं पात्र साकारलं आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. आता सिनेमात काय काय असणार हे पाहणं निश्चितच रंजक ठरणार आहे.

पाहा ट्रेलर-

 

 

संजय दत्तने या सिनेमात साकारलेली भूमिका ही प्रॉमिसिंग दिसते आहे. संजय दत्तचा या सिनेमातील भूमिकेतला लुकही हटके दिसतो आहे. आता सिनेमात संजय दत्त अफगाणिस्तानातील रेफ्युजी कॅम्पमध्ये अडकलेल्या मुलांना क्रिकेट शिकवण्यात यशस्वी होतो का? दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडतो का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 4:06 pm

Web Title: torbaaz trailer sanjay dutt turns messiah for children in afghan refugee camps scj 81
Next Stories
1 …म्हणून ‘राऊडी बेबी’च्या यशानंतर साई पल्लवीचे चाहते झाले नाराज
2 अक्षय कुमारच्या ५०० कोटींच्या दाव्यावर यूट्यूबर राशिदने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
3 ११ डिसेंबरला थिएटरमध्ये धडकणार ‘इंदू की जवानी’?
Just Now!
X