News Flash

Photo : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची

या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही जोडी १७ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत.

२०१८ हे वर्ष बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्यासाठी खास ठरलं. या वर्षामध्ये अजयचे ‘रेड’ आणि ‘सिम्बा’ हे दोन सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर अजय त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे वळला आहे. त्याचा ‘तानाजी’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसापूर्वी ‘तानाजी’मधील त्याचा फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटातील फर्स्ट लूकही प्रेक्षकांसमोर आला आहे.

टोटल धमालमधील अजयचा लूक समोर आल्यानंतर त्याने आणि चित्रपट व्यापार विश्लेषण तरण आदर्श यांनी ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. प्रदर्शित झालेल्या या लूकमध्ये अजय रावडी लूकमध्ये दिसत असून त्याच्या खांद्यावर एक माकड बसलं आहे. विशेष म्हणजे अजयचा हा लूक पाहता ‘राजा और रॅन्चो’ या मालिकेची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

अजयने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये अजयसोबत माधुरी दीक्षित, अनिल कपूर ही स्टारकास्ट मंडळीही झळकणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही हीट जोडी १७ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:05 pm

Web Title: total dhamaal first look out ajay devgn with crystal
Next Stories
1 शाल्मली म्हणतेय ‘हे मन माझे का भिरभिरते…’
2 Video : ‘Game Of Thrones Season 8’ चा टीझर प्रदर्शित
3 …म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक
Just Now!
X