आगमी लोकसभा निवडणुकांच्या काळात बहुप्रतिक्षित असा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी सर्वाधिक उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास या बायोपिक दाखवण्यात आला आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. मात्र हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच नेटकऱ्यांनी या ट्रेलरमधील संवादांचे मिम्समध्ये रुपांतर केले आहे. अनेकांनी हा चित्रपट जरा जास्तच सिनेमॅटिक वाटत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हा या वर्षीचा सर्वोत्तम सिनेमा असेल असं मत व्यक्त केलं आहे. पाहुयात या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनानंतर व्हायरल झालेले काही ट्विटस

आयुष्यातील अडचणींपासून पळण्याचा एकमेव उपाय

भाजपावालेच म्हणतील बंदी आणा

ट्रेलर पाहिल्यावर मोदींची रिअॅक्शन

असा झाला नोटबंदीचा निर्णय

एप्रिल-मे मधील गुजरातमधील परिस्थिती

थानोसपेक्षा जास्त ताकदवान

गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं

सिनेमाचा शेवट

ताज बांधून झाल्यानंतर

परिक्षा झाल्यावर मी नोट्स अशा उडवतो

मोदीच सर्वोत्तम अभिनेते आहेत

सिनेमात हे ही दाखवा

युनिस्कोने केली घोषणा

ज्या बांगलादेशी लोकांना आधारकार्ड मिळत नाही

…म्हणून निवडणूकांआधी सिनेमा काढा

जेव्हा लहान मुले माझ्या फोनबरोबर खेळतात

महत्वाची लोक दाखवली नाहीत

सिनेमा प्रदर्शनानंतर

ऑस्कर पुरस्कार विजेत्या नेत्याचा बायोपिक

जेव्हा तुम्ही काटा चमचाने डोसा खाता

ब्रेकअपनंतर

ट्रेलर पाहिल्यानंतर

गब्बर ठाकूरला

कॉलेजमध्ये दोन वर्षांनंतर

बाबा नवीन गाडी…

ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. एक सामान्य चहा विक्रेता ते सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान असा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २३ भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.